खूशखबर! 2 हजारांपर्यंतचं बिल स्वाईप केल्यावर आता सेवा कर नाही

December 8, 2016 3:49 PM0 commentsViews:

debit_Card

08 डिसेंबर :  नोटाबंदीच्या निर्णयानंतर कॅशलेस होण्यासाठी नागरिकांना जास्तीत जास्त आकर्षित व्हावं यासाठी  केंद्र सरकारकडून गुरुवारी मोठा निर्णय घेतला आहे. डेबिट किंवा क्रेडिट कार्डच्या मदतीने केल्या जाणाऱ्या 2000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर यापुढे सेवा कर आकारण्यात येणार नाही. या निर्णयामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आतापर्यंत डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड स्वाईप करण्यासाठी एकूण खरेदीवर 2 टक्के सेवाकर आकारण्यात येत होता. त्यामुळे अनेक ग्राहक कार्ड ऐवजी रोख रक्कम देऊनच व्यवहार पूर्ण करण्यावर भर देत होते. पण आता या नवीन निर्णयामुळे डेबिट किंवा क्रेडिट कार्डच्या साह्याने कोणतेही अतिरिक्त पैसे न देता २००० रुपयांपर्यंतचे व्यवहार करणं शक्य होईल. कॅशलेस प्रणालीला चालना देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. यामुळे हॉटेलमध्ये खाण्यावर, लागणारा कर रद्द होणार असल्याने हे व्यवहार तुलनेने स्वस्त होणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close