लासलगावात कांद्याचे भाव गडगडले

December 8, 2016 5:36 PM0 commentsViews:

onion3452308 डिसेंबर : लासलगाव,मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजारसमित्यांमध्ये लाल सोबत उन्हाळ कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढल्याने त्याचा परिणाम कांद्याचा भावावर झालाय. एका आठवड्यात कांद्याच्या किंमतीत क्विंटलमागे चार शे रुपयांची घसरण झालीये.

स्वकष्टाने पिकवलेला कांदा मातीमोल भावाने विकावा लागत असल्याने शेतकरी हवालदिल झाला असून कांद्याला किमान एक ते दीड हजार रुपये हमी भाव देण्यात यावा अशी मागणी शेतक-यांनी केलीये. गेल्या आठवड्यात लासलगाव,मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याला सरासरी बाराशे रुपये तर उन्हाळ कांद्याला साडे नऊशे रुपये प्रती क्विंटल भाव होता. मात्र सध्या लाल कांद्याचा हंगाम असतानाही बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर झाल्याने आवक जास्त आणि मागणी कमी अशी परिस्थिती निर्माण झाल्याने कांद्याच्या भावात मोठी घसरण झालीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close