चेन्नईत तब्बल 90 कोटी आणि 100 किलो सोनं जप्त

December 8, 2016 6:14 PM0 commentsViews:
साभार -गेटी इमेजेस

साभार -गेटी इमेजेस

08 डिसेंबर : नोटबंदीनंतर देशभरात पैसे जप्त होण्याच्या घटना घडल्या होत्या. आज चेन्नईमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी जप्तीची कारवाई घडली असून आयकर विभागाने तब्बल 90 कोटी रुपये जप्त केले आहेत. यात 70 कोटी या नव्या नोटा आहे. तर 100 किलो सोनंही जप्त करण्यात आलंय.

चेन्नईमध्ये आयकर विभागाने ज्वेलर्स श्रीनिवास रेड्डी, सेकर रेड्डी आणि एजंट प्रेम यांच्या घरी छापे टाकले. एकूण आठ ठिकाणी छापे टाकण्यात आले. या कारवाईत हाती लागलेलं घबाड पाहुन आयकर विभागाचे अधिकारीही हैराण झाले. तब्बल 90 कोटींची रोकड हस्तगत करण्यात आलीये.

विशेष म्हणजे यात 70 कोटी नव्या नोटा आहे. यात 10 कोटी रुपये हे 2000 च्या नव्या नोटा आहे. या कारवाई 100 किलो सोनंही जप्त करण्यात आलंय. याची बाजारभावानुसार 30 कोटी किंमत आहे. 100 किलो सोन्यापैकी 70 किलो सोनं हे एका हॉटेलमधून जप्त करण्यात आलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close