कॅशलेसचा नारा, टोल ते रेल्वे तिकीटावर सवलतींचा वर्षाव

December 8, 2016 6:48 PM0 commentsViews:

arun_jaitly_new08 डिसेंबर : नोटबंदीच्या निर्णयाच्या एका महिन्यानंतर केंद्र सरकारने सर्वसामान्यांना कॅशलेसचा मुलमंत्र देत सवलतीचा वर्षाव केलाय. रेल्वे पास, पेट्रोल खरेदी, विमा पॉलिसी, टोल, आणि हॉटेलिंग करणाऱ्यांना अर्धा टक्क्यापासून ते 10 टक्क्यांपर्यंत सूट देण्याची घोषणा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केलीये. पेट्रोल आणि डिझेल खरेदी केल्यावर आता 0.75 टक्के सूट मिळणार आहे.

अरुण जेटली यांनी आज पत्रकार परिषद घेऊन नोटबंदीच्या निर्णयानंतर झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी नोटबंदीमुळे कॅशलेस व्यवहारात देशभरात वाढ झाल्याची गोष्ट नमूद केली. तसंच दररोज जवळपास 4.5 कोटी लोक पेट्रोल,डिझेल खरेदी करतात. याची जवळपास विक्री 18 कोटी इतकी आहे. गेल्या महिन्यात नोटबंदीमुळे कॅशलेस पेमेंट करण्याची संख्या ही 20 टक्क्यांवरुन 40 टक्क्यांवर पोहचली आहे. कॅशलेसला प्रोत्साहन देण्यासाठी 0.5 टक्के सूट देण्यात येणार आहे.

कॅशलेस व्यवहारासाठी घोषणा

1) पेट्रोल-डिझेल खरेदीवर 0.75 टक्के सूट
2) नाबार्ड माध्यमातून 4 कोटी 32 लाख शेतक-यांकडे किसान क्रेडिट कार्ड आहे त्यांना रुपे कार्ड देणार
3) लोकलचा पास काढणाऱ्यांना 0.5 टक्के सूट, नव्या वर्षात 1 जानेवारीपासून मुंबईतून योजनेला सुरुवात
4) ऑनलाईन रेल्वे तिकीट बूक करणाऱ्यांना 10 लाखांचा अपघाती विमा, कॅश तिकीट खरेदी करणाऱ्यांना विमा नाही
5) ऑनलाईन विमा पेमेंट केल्यास जनरल विमा कंपन्यांना 10 टक्के तर एलआयसीला 8 टक्के सूट
6) नॅशनल हायवेवर टोल कार्डने पेमेंट केल्यास 10 टक्के सूट
7) रेल्वे केटरिंग आणि गेस्ट रुमसाठी 5 टक्के सूट
8) 2000 रुपयांपर्यंत खरेदी केल्यास सेवाकर नाही

9) देशात 10 हजार लोकसंख्या असलेली जवळपास एक लाख गावं आहे. अशा गावांमध्ये सरकारी फंडमधून 2 पाईंट ऑफ सेल मशीन मोफत देण्यात येणार.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close