स्वराजांचा असाही मोठेपणा, त्या ‘वजनदार’ महिलेवर होणार भारतात उपचार

December 8, 2016 11:37 PM0 commentsViews:

500 kg woman08 डिसेंबर : इजिप्तमधल्या एका महिलेचं वजन 500 किलो एवढं वाढलंय. या महिलेवर भारतामध्ये वजन कमी करण्याची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. एमन अहमद अब्द- एल- एती असं या महिलेचं नाव आहे. 36 वर्षांच्या या महिलेला इजिप्तमधून खास विमानाने भारतात आणण्यात येणार आहे.

डॉ. मुफ्फजल लकडावाला हे या महिलेवर शस्त्रक्रिया करणार आहेत. याआधी या महिलेला इजिप्तमधल्या भारतीय दूतावासाने व्हिसा नाकारला होता. कारण ही महिला व्हिसाच्या प्रक्रियेसाठी दूतावासामध्ये येऊ शकत नव्हती. पण डॉ. मुफ्फजल लकडावाला यांनी ट्विटरवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला. त्यामुळे तिला व्हिसा देण्यात आला. भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज सध्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. पण याही स्थितीत सुषमा स्वराज या परदेशातल्या नागरिकांना मदत करण्यासाठी तत्पर आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close