नोटाबंदीनंतरही साईबाबांच्या झोळीत तब्बल 17 कोटी 43 लाखांचं दान

December 9, 2016 12:29 PM0 commentsViews:

  aim_bn_1388726826

09 डिसेंबर :  नोटबंदीच्या निर्णयानंतर एक महिन्यात साई चरणी तब्बल 17 कोटी 43 लाखांच दान प्राप्त झाल असून दान पेटी, ऑनलाईन, देणगी काऊंटरवर, त्याचसोबत डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या माध्यमातून हे दान प्राप्त झालं आहे.

विशेष म्हणजे साई चरणी जुन्या नोटाही मोठ्या प्रमाणात अर्पण केल्या गेल्या आहेत. नवीन आलेल्या दोन हजारांच्याही नोटा दान पेटीत मिळाल्या आहेत.

गेल्या महिन्यात नोटबंदीच्या निर्णयानंतर साई चरणी एकूण 17 कोटी 43 लाख रुपयांचं दान विविध माध्यमातून प्राप्त झाले.

– दानपेटी – 10 कोटी रुपये
– ऑनलाईन देणगी – 97 लाख 17 हजार
– देणगी काऊंटर – 1 कोटी 65 लाख
– चेक डीडी – 2 कोटी रुपये
– डेबिट व क्रेडिट कार्ड – 1 कोटी 20 लाख रुपये
– प्रसादालयात देणगी – 6 लाख रुपये

या शिवाय गेल्या महिनाभरात अनेकानी व्हीआयपी दर्शन पासच्या माध्यमातून तब्बल एक कोटी रुपये संस्थानला दान स्वरुपात मिळाले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close