‘रईस’ रिलीज होईपर्यंत चलनतुटवड्याचे प्रश्न संपतील – शाहरूख खान

December 9, 2016 1:49 PM0 commentsViews:

 

srk-raees-759

09 डिसेंबर : ‘चलनतुटवड्यामुळे ‘रईस’च्या व्यवसायावर काही परिणाम होणार नाही,’ हा विश्वास व्यक्त केलाय किंग खाननं. बुधवारी ‘रईस’च्या ट्रेलर लॉचच्या सोहळ्यात शाहरुख आपला आगामी चित्रपट,डिअर जिंदगी आणि चलनतुटवड्याविषयी बोलत होता.

पुढच्या काही दिवसांत अर्थात रईसच्या रिलीजपर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेत स्थिरता येईल,असं शाहरूख खानचं म्हणणं आहे. ‘नोटबंदी आणि नोटबदलींमुळे मनोरंजन क्षेत्राला महिनाभरात मोठा तोटा सहन करावा
लागला,’असं शाहरूख खान म्हणतो.

सिंगल स्क्रीन थिएटर्सवर या चलनतुटवड्याचा सगळ्यात जास्त परिणाम होतोय.या महिन्याभरात रिलीज झालेल्या सगळ्याच चित्रपटांना याचा त्रास सहन करावा लागला.मात्र या बादशहाला वाटतंय की येत्या काही दिवसांत परिस्थितीत सुधारणा होईल.

बुधवारी ट्रेलर लॉचच्या सोहळ्यात शाहरूख पत्रकार परिषदेत म्हणाला की,’अशा निर्णयांनंतर परिस्थिती सुरळीत व्हायला थोडा वेळ लागतो.चलनतुटवडा असताना लोक कधीही मनोरंजनाला प्राधान्य देत नाहीत.
अशावेळी मुख्य गरजांना प्राधान्य दिलं जातं आणि चैनीच्या गोष्टी थांबवल्या जातात.’डिअर जिंदगी’च्या वेळी गोष्टी नियंत्रणाखाली येत असल्याचं आम्हाला दिसून आलं.लोक पुन्हा थिएटर्समध्ये पैसे खर्च करतायत, म्हणजे परिस्थिती सकारात्मक आहे,अनुकूल आहे.’

बॉलिवूडचा बादशहा शाहरूख खानच्या ‘रईस’चा ट्रेलर प्रेक्षकांची पसंती मिळवतोय.’रईस’ येत्या 26 जानेवारीला रिलीज होतोय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close