राणीनं शेअर केले छोट्या अदिराचे फोटो

December 9, 2016 2:45 PM0 commentsViews:

Rani Mukharjee Adira

09 डिसेंबर : राणी मुखर्जीच्या मुलीच्या पहिल्या वाढदिवशी तिने पोस्ट केलेला मुलीसोबतचा फोटो आणि पत्र चर्चेचा विषय ठरलंय.आदित्य चोप्रा आणि राणी मुखर्जी यांच्या मुलीचा-अदिराचा-आज पहिला वाढदिवस.त्यानिमित्ताने तिने दोघींचा एक छान फोटो पत्रासहित ट्विटरवर पोस्ट केलाय.

तिनं लिहिलंय, ‘मी अदिरावर खूप प्रेम करते.मी आता तिच्याशिवाय जगू शकत नाही.तिच्या येण्याने माझ्या जीवनात खूप सकारात्मक बदल झाले आहेत.कोणत्याही बाळाचं संगोपन करणं कठीण असतं.मी तिला नाही तर तिनेच मला आई म्हणून जन्म दिलाय.मी दिवस-रात्र झोपत नाही.सगळ्याच आई आपल्या मुलांसाठी रात्रभर जागतात.मी त्यांना सॅल्युट करते.अदिरासारखी गोड मुलगी मला दिल्याबद्दल मी देवाचे आभार मानते.’

गेलं संपूर्ण वर्ष राणीने आपल्या मुलीला मीडियापासून दूर ठेवलं होतं. आत्ता मात्र तिनं पहिल्यांदाच स्वत:हून अदिराचा फोटो सोशल मीडियावर टाकलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close