राहुल गांधी पाठोपाठ विजय मल्ल्याचेही ट्विटर अकाऊंट हॅक

December 9, 2016 3:16 PM0 commentsViews:

vijay_mallya

09 डिसेंबर : बँकांचे हजारो कोटींचे कर्ज बुडवून पसार झालेल्या विजय मल्ल्यांचं ट्विटर अकाऊंट हॅक झालं आहे. विशेष म्हणजे ज्यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींचं ट्विटर अकाऊंट हॅक केलं होतं, त्याच लिझन ग्रुपने विजय मल्ल्यांचंही अकाऊंट हॅक केलं आहे.

विजय मल्ल्यांनी स्वत: ट्विट करत आपलं अकाऊंट हॅक झालं असून माझ्या नावाने ट्विट केलं जात असल्याची माहिती दिलीये. तसंच आपले ई-मेल अकाऊंटही हॅक करण्यात आलं असून मला ब्लॅकमेल केलं जात आहे असंही मल्ल्यांनी ट्विटरवरुन सांगितलं आहे.

हॅकर्सने विजय मल्ल्यांचं ट्विटर अकाऊंट हॅक केल्यानंतर त्यावरुन काही ट्विट करत आपल्याकडे मल्ल्यांची विविध बँकेत असणा-या संपत्तीची माहिती आणि पासवर्ड असल्याचं ट्विट केलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close