नोकरदार महिलांविरुद्ध फतवा

May 12, 2010 2:55 PM0 commentsViews: 4

12 मे

भारतातील सर्वात मोठे इस्लामी शिक्षणाचे केंद्र असलेल्या उत्तर प्रदेशातील दारूल उलूम देवबंदने आता आणखी एक फतवा काढला आहे.

यावेळी हा फतवा आहे, नोकरदार महिलांच्या विरोधात.

महिला आणि पुरुष एकत्रित काम करत असलेल्या ठिकाणी मुस्लीम महिलांनी काम करायचे नाही. शिवाय महिलांच्या कमाईचा पैसा वापरणे कुटुंबीयांसाठी हराम म्हणजेच बेकायदेशीर आहे, असेही देवबंदने म्हटले आहे.

फतवा म्हणजे कायदेशीर बंधन नाही…फतवा हा एखाद्या मुफ्ती किंवा विचारवंताने वैयक्तिक पातळीवर काढलेला असतो.

सध्या भारतीय मुस्लीम समाजात आपले एक स्थान निर्माण करण्याच्या प्रयत्नात असताना असा फतवा काढणे म्हणजे इस्लामबद्दल चुकीचा संदेश पसरवणे आहे.

close