विदर्भातल्या नद्या वाचवा – राजेंद्र सिंग

October 19, 2008 7:11 AM0 commentsViews: 8

19 ऑक्टोबर, वाशीम विदर्भातल्या शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी विदर्भातल्या नद्या वाचवल्या पाहिजेत, असं मत मॅगसेसे पुरस्कार विजेते राजेंद्र सिंग यांनी व्यक्त केलं आहे. वाशीम जिल्ह्यातील कांरजा इथे कालपासून दोन दिवसांच्या नदी संमेलनाला सुरुवात झाली आहे. राजस्थानसारख्या राज्यात पाणी व्यवस्थापनामुळे शेतकरी तीन पिकं घेत आहेत. तर विदर्भात नद्या असताना अशी परिस्थिती का, असा सवाल राजेंद्रसिंग यांनी त्यावेळी उपस्थित केला. दोन दिवस चालणार्‍या संमेलनात नदी संरक्षणापासून पाण्याच्या व्यवस्थापनापर्यंत सर्वच विषयांवर चर्चा होणार आहे.

close