एक बोट आमच्याकडे तर तीन तुमच्याकडे, मुख्यमंत्री विरोधकांवर कडाडले

December 9, 2016 5:48 PM0 commentsViews:

devendra_fadanvis4409 डिसेंबर : मराठा आरक्षण हा राजकीय मुद्दा नाही. जर राजकीय वळण द्यायचं ठरलं तर एक बोट आमच्याकडे आहे तर चार बोट तुमच्याकडे आहे. तुम्ही आघाडीवर असतांना हा निर्णय झालाय असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधकांवर चांगलेच कडाडले.

मराठा आरक्षणाबाबत विधानसभेत झालेल्या चर्चेला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. मराठा आरक्षण रखडल्याचं खापर मुख्यमंत्र्यांनी आघाडी सरकारवर फोडलं. याबाबत टीका करून राजकारण करणा•यांना त्यांनी खडे बोल सुनावले.

मराठा आरक्षण मंडल आयोगाने नाकारलं त्यावेळी याबद्दल अभ्यास करणं गरजेचं होतं. बापट आयोग, हायकोर्ट ज्यावेळी सांगतं की मराठा समाज मागास कसं आहे असं सांगून नाकारलंय. ज्यावेळी तीनतीन आयोग मराठा समाज मागास नाही असं सांगत आहे तर तुम्ही कोणत्या मुद्द्यावर मराठा समाज मागास असल्याचं सिद्ध करताय. म्हणून त्यावेळी याबद्दल योग्य भूमिका घेणं गरजेचं होतं पण तसं झालं नाही. खत्री आयोगाच्या वेळीही तशी बाजू मांडली गेली नाही अशी आठवणही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना करून दिली.

मराठा आरक्षण हा राजकीय मुद्दा नाही. त्याचं राजकारण करू नका असं आवाहन केलं होतं. पण, हा राजकीय प्रश्न नाहीये. राजकीय वळण द्यायचं ठरलं तर एक बोट आमच्याकडे आहे तर चार बोट तुमच्याकडे आहे. तुम्ही आघाडीवर असतांना हा निर्णय झालाय असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधकांवर चांगलेच कडाडले.

त्यासोबतच कुणी कितीही विरोध केला तरिही ऍट्रोसिटीचा कायदा रद्द होणार नाही. त्याबाबतच्या त्रुटी समितीच्या माध्यमातून कमी करता येतील असंही त्यांनी सुचवलं. यासोबतच धनगर आरक्षणाबाबही संशोधनाची गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.

धनगर समाजाला आरक्षण देण्यापूर्वी पूर्ण संशोधन करून मगच ते देऊ असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. असं करण्यामागे सरकारची नक्की काय भूमिका आहे ती देखील मुख्यमंत्र्यांनी स्पप्ट केली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close