महाविद्यालयात घुमणार आवाज कुणाचा ?

December 9, 2016 6:09 PM0 commentsViews:

college_election09 डिसेंबर : कॉलेज कॅम्पसमध्ये आता पुन्हा एकदा गुलाल उधळला जाणार आहे. कारण महाविद्यालयांमध्ये निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झालाय. विधानसभेनं गुरुवारी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक मंजूर केलंय.

आतापर्यंत कॉलेजचा जीएस तसंच वर्गातले प्रतिनिधी हे मेरिटच्या आधारावर निवडले जायचे. मुलांमध्ये राजकीय समज तसंच नेतृत्वगुण खुंटले जायचे. ते बंद व्हावं म्हणून पुन्हा एकदा निवडणुकीचा गुलाल उधळला जाणार आहे. नव्या विधेयकानुसार आता महाविद्यालयांना परिक्षेचं वर्षभराचं वेळापत्रक, विद्यार्थ्यांना आवडीचा विषय निवडण्याची मुभा अशा अनेक तरतुदीत आमुलाग्र बदल केले गेलेत. नफेखोरी तसंच गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठीही तरतुदी केल्या गेल्यात.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close