मला नाराज करू नका, 100 बॉक्स दारू द्याच, भाजप आमदाराची धमकी

December 9, 2016 7:26 PM0 commentsViews:

paskal_dhanare309 डिसेंबर : पालघर जिल्ह्यातील तलासरी पंचायत समिती निवडणुकीदरम्यान डहाणू-तलासरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार पास्कल धनारे यांनी उत्पादन शुक्ल विभागाच्या अधिकाऱ्यांला धमकावल्याची व्हिडिओ क्लीप सध्या वायरल झालीये. या व्हिडिओमध्ये निवडणुकीदरम्यान मतदारांना खुश करण्यासाठी धानोरे यांनी या अधिकाऱ्याकडे तब्बल 100 बॉक्स दारूची मागणी केलीय.आपल्याला दारू उपलब्ध करून दिली नाही तर जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांबाबत आपण पोलीस अधिक्षकांकडे तक्रार करू असा दमच त्यांनी या अधिकाऱ्याला भरलाय.

राज्यात पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये भाजपला अभूतपूर्व यश मिळालं. यानं भाजपच्या गोटात जरी आनंद असला तरी या निवडणुका जिंकण्यासाठी भाजपने जे जे हतखंडे वापरले ते आता बाहेर पडायला सुरुवात झाली आहे.

पालघर जिल्ह्यातील तलासरी नगर पंचायत निवडनुकीतली. डहाणू-तलासरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार पास्कल धनारे आणि उत्पादन शुल्क विभागाच्या एका कर्मचाऱ्यातील संभाषणाची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर वायरल झाली आहे. यात निवडणूक लढताना मतदारांना खुश करण्यासाठी लोक प्रतिनिधी धनारे यांनी उत्पादन शुल्क निरीक्षकांकडे तब्बल 100 बॉक्स दारूची उघड उघड मागणी केली आहे.

या क्लिपमध्ये धनारे हे कर्मचाऱ्याशी बोलत आहेत. यात तालुक्यात चाललेल्या अवैध धंद्यांवर उत्पादन शुल्क विभाग दुर्लक्ष करत आहे. अनेक ठिकाणी लाच घेतली जाते याच्या तक्रारी मी पालघर एसपी कडे करीन. मला नाराज करू नका अशी धमकी देऊन निवडणुकीत वाटण्यासाठी 50 बॉक्स व्हिस्की आणि 50 बॉक्स बिअर अशी तब्बल 100 बॉक्स दारू धानोरे मागत आहेत.

याच्या विरोधात निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग डहाणू यांनी अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग पालघर जिल्हा यांना पत्र लिहून तक्रारही केली आहे. यात आमदार धनारे यांनी अनेक वेळा अवैध धंद्यांना संरक्षण दिल्याचेही नमूद करण्यात आले आहे. स्थानिक लोक प्रतिनिधीच सहकार्य करण्याऐवजी जर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना काम करू देत नसतील आणि निवडनुकीसाठी खंडणी मागत असतील तर काम कसे करायचे असा सवाल इथं निर्माण होतो.

धनारे ऑडिओ क्लिप

पास्कल धनारे – बघ नाही तर हे करणार तिथे…
अधिकारी – काय पाहिजे ते तुम्ही सांगा ना, मी विचारतो बाबा… साहेब नाही फोनवर… तुम्ही मला बोला ना?
पास्कल धनारे – मी त्यांना सांगितले 100 बॉक्स पाठवून द्या ते…
अधिकारी – कोणते 100 बॉक्स? कोणते? बिअर पाहिजे की विस्की पाहिजे? बिअरच ना?
पास्कल धनारे – नाय, 50 विस्की द्या, 50 बिअर द्या
अधिकारी – कोणता ब्रँड? वगैरे काय…
पास्कल धनारे – कुठला पण द्या, आपल्याला प्यायला नाय पाहिजे तो. लोकांना खूश करायला. माझ्या येथे या, तेव्हा तुम्हाला बोलतो…


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close