गोरखपूर-दिल्लीसाठी शाही रेल्वे

December 9, 2016 8:49 PM0 commentsViews:

गोरखपूरपासून नवी दिल्लीपर्यंतचा आपला प्रवास सुकर होण्याची शक्यता आहे. भारतीय रेल्वे या महिन्यांत एक नवीन शानदार आणि आरामदायी ट्रेन घेऊन यायचा विचार करतेय. तीचं नावसुद्धा तसंच आहे ‘हमसफर’. लवकरच दिल्लीतून या ट्रेनला हिरवा कंदील मिळेल.

या ट्रेनमध्ये लहानश्या ओव्हन आणि फ्रिजची सोय असेल. रेल्वेच्या सीटही आरामदायक बनवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. प्रत्येक सीटजवळ मोबाईल चार्जरची सुविधा असेल. ट्रेनमध्ये थ्री टायर कोच असेल. ट्रेनमधील प्रवाश्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमे•यांची सोय असणार आहे. भविष्यातील संकटांचा विचार करुन फायर अलार्मिंग सिस्टीमची सोय असेल. या सगळ्या सोयी-सुविधा पाहता प्रवास सुखकर असेल याची शंका नाही,मात्र तिकीटाचे दरही तसंच असतील हे नक्की.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close