याला म्हणता नोटबंदी, बँकेने दिले चक्क 13 हजार चिल्लर !

December 9, 2016 9:05 PM0 commentsViews:

09 डिसेंबर : चलन तुटवड्यामुळे सगळ्यांचेच चिल्लरचे वांदे झाले आहे. मात्र मुंबईतल्या चंद्रकांत खैरे या बँक ग्राहकाला मात्र वेगळाच प्रश्न पडलाय. खैरे यांना त्यांच्याकडंचे सुट्टे कसे खर्च करावेत असा प्रश्न पडलाय. बँकेनं त्यांना एक दोन नव्हे तब्बल 13 हजार रुपयांची चिल्लर दिलीये. या चिल्लरचं वजनच बारा ते 13 किलो आहे. त्यामुळे बँकेतून चिल्लरच्या पिशवीचं वजन सांभाळतच खैरे बाहेर पडले. पण चिल्लर जरी तेरा हजारांची मिळाली असली तरी खैरेंना झालेला आनंद काही औरच आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close