आर.अश्विनची कपिल देवच्या रेकॉर्डशी बरोबरी

December 9, 2016 10:27 PM0 commentsViews:

r_ashwain409 डिसेंबर : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात आर.अश्विनने माजी कर्णधार कपिल देवच्या रेकॉर्डशी बरोबरी केली आहे. वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या चौथ्या भारत विरुद्ध इंग्लंडच्या या सामन्यात त्याने बेन टोक्सची विकेट घेतली. हा त्याचा इनिंगमधला पाचवा बळी ठरला. त्याचा झेल विराट कोहलीच्या हातात जाताच एक रेकॉर्ड अश्विनच्या नावावर झाला.

आतापर्यंत त्याने कसोटी सामन्यांत एकाच डावात 23 वेळा 5 विकेट्स मिळवल्या आहेत. त्याच्या या कामगिरीची तुलना कपिल देवच्या आकडेवारीशी होतेय. कपिल देवनेही त्यांच्या 43 डावांत 23 वेळा पांच विकेट्स मिळवण्याचा रेकॉर्ड केला होता. मात्र त्यासाठी त्यांना 121 सामने खेळावे लागले होते. अश्विनने मात्र 43 सामन्यांत हा रेकॉर्ड बनवलाय. अशाप्रकारे आर.अश्विनने आजच्या सामन्यांत कपिल देवच्या या रेकॉर्डची बरोबरी केली आहे.

या दोघांच्याही पुढे हरभजन सिंग आणि अनिल कुंबळे अनुक्रमे 25आणि 35 असा रेकॉर्ड सांभाळुन आहेत.अश्विनच्या सहा विकेट्समुळे इंग्लंडचा डाव फक्त 400धावांवर आटोपला. भारताचा हा फिरकी गोलंदाज कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाजीची बाजु प्रभावीपणे सांभाळतो.एवढंच नाही,तर गरजेच्या वेळी तो बॅटींगमध्येही संयमी खेळ करतो.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close