अम्मांच्या निधनाच्या धक्क्याने 280 जणांचा मृत्यू

December 10, 2016 3:03 PM0 commentsViews:

Jayalalithaa's supporters

10 डिसेंबर :  तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनाच्या धक्क्याने आत्तापर्यंत 280 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. यातील मृतांच्या कुटुंबाला 3 लाख रुपये तर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱयाला प्रत्येकी 50 हजारांची आर्थिक मदत करण्यात येणार आहे.

जयललिता या तामिळनाडूमध्ये तामिळ बांधवांसाठी ‘अम्मा’ म्हणून परिचयाच्या होत्या. त्यांनी तामिळ बांधवांसाठी विशेष असे कार्य केले. त्यांच्या गरजा जाणून त्या गरजांची पूर्तता करण्याचा अम्मांनी प्रयत्न केला. त्यांचे हे प्रेम इतके मोठे होते की त्यांच्या निधनाची बातमी समजताच जवळपास 280 जणांचा मृत्यू झाला. तर अनेक कार्यकर्त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.

दरम्यान, जयललिता यांच्या निधनाच्या धक्क्याने ज्या लोकांचा मृत्यू झाला अशा कुटुंबांना अण्णा द्रमुक पक्षाकडून 3 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. तसेच अम्मांच्या गंभीर आजारपणाबद्दल कळल्यानंतर ज्यांनी स्वतःला संपवून घेण्याचा प्रयत्न केला त्या पक्ष कार्यकर्त्याला प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close