सलग तिसऱ्यांदा जळगावचा विजय चौधरी ‘महाराष्ट्र केसरी’

December 10, 2016 8:39 PM0 commentsViews:

10 डिसेंबर : जळगावचा कुस्तीपटू विजय चौधरी याने सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकावला आहे. विजयने पुण्याचा कुस्तीपटू अभिजित कटकेला पराभवाची धूळ चारत महाराष्ट्र केसरी होण्याची हॅटट्रीक साधली आहे. या विजयाबरोर नरसिंग यादवनंतर विजयाची हॅटट्रीक साधणारा विजय चौधरी हा दुसरा कुस्तीपटू ठरला आहे.

Maha kesari1231

पुण्यातील बालेवाडी क्रिडा संकुलात हा अंतिम सामना पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारही हा अंतिम सामना पाहण्यासाठी उपस्थित होते.

अभिजीत हा पहिल्यांदाच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सहभागी झाला, आणि त्याने थेट अंतिम फेरीपर्यंत धडक मारली. विजय चौधरीची हॅट्रीकचे स्वप्न अभिजीत मोडेल असे सर्वांना वाटत होतं. त्याप्रामाणे त्याने चपळाईने खेळ देखील केला. पण शांत डोके ठेऊन मैदानात उतरलेल्या विजयने अभिजीतला संधी दिलीच नाही, आणि सलग तिसऱ्यांदा त्याने महाराष्ट्र केसरीच्या मानाच्या गदेवर आपले नाव कोरले. विजय चौधरीने अभिजित कटके याचा 2-0 असा दणदणीत पराभव करत मानाची चांदीची गदा मिळवली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close