भाजप-राष्ट्रवादी युतीवर बाळासाहेबांची टीका

May 12, 2010 3:07 PM0 commentsViews: 3

12 मे

अंबरनाथमध्ये भाजपने राष्ट्रवादीशी केलेल्या युतीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी टीका केली आहे.

भाजपच्या नाकर्तेपणामुळेच भगवा खाली उतरला अशी खंत बाळासाहेबांनी व्यक्त केली आहे.

शिवसेनेने पुण्यात राष्ट्रवादीशी युती केली तेव्हा भाजपने नाराजी व्यक्त केली होती. आता त्यांना राष्ट्रवादीशी संगत चालते का? असा सवालही त्यांनी केला.

काही मतभेद असते तर चर्चेने मिटवता आले असते. त्यासाठी राष्ट्रवादीच्या गळ्यात गळा घालण्याचे कारण नाही, असेही बाळासाहेब म्हणाले.

close