विराटनं ठोकलं दुहेरी शतक

December 11, 2016 12:42 PM0 commentsViews:

virat web

11 डिसेंबर : वानखेडे स्टेडियम आज एका ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार झाला.आज कॅप्टन विराट कोहलीने डबल सेंच्युरी ठोकली.वानखेडे स्टेडिअमवर सुरू असलेल्या भारत -इंग्लंड दरम्यान कसोटी सामन्यात विराटने दमदार खेळी केली.

कोहलीने तिसऱ्या दिवसाचा फॉर्म चौथ्या दिवशी देखील कायम राखत कसोटी कारकिर्दीतील आपली तिसरी डबल सेंच्युरी मारली.विशेष म्हणजे कोहलीने तिन्ही दुहेरी शतकं यंदाच्या एकाच वर्षात ठोकली.इंग्लंड विरुद्धची कोहलीची ही सर्वोत्तम खेळी ठरली आहे.कसोटीमध्ये तीन डबल सेंच्युरी ठोकणारा कोहली पहिलाच भारतीय कर्णधार ठरला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close