किंग खानची ‘हृदयांतर’च्या मुहूर्ताला उपस्थिती

December 11, 2016 2:45 PM0 commentsViews:

srk hridayantar

11 डिसेंबर:बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खानने ‘हृदयांतर’ या मराठी सिनेमाच्या मुहूर्ताला आवर्जून हजेरी लावली.मुक्ता बर्वे, सुबोध भावे, सोनाली खरे अशी दमदार कलाकारांची फळी असलेल्या ‘हृदयांतर’ या सिनेमाचा मुहूर्त नुकताच मुंबईत थाटात पार पडला.

फॅशनच्या दुनियेतलं मोठं नाव विक्रम फडणीस या सिनेमाच्या निमित्ताने प्रथमच दिग्दर्शनक्षेत्रात पाऊल टाकत आहेत.प्रताप सरनाईक आणि विक्रम फडणीस यांची निर्मिती असलेल्या हृदयांतर या सिनेमाच्या मुहूर्ताला शाहरुख खानसह अर्जून कपूर, सोहेल खान, साजिद खान, मलायका अरोरा, अथिया शेट्टी यांसह अनेक बॉलिवूड कलाकार उपस्थित होते.

‘हृदयांतर’ एक भावनात्मक गोष्ट आहे.एका जोडप्याच्या लग्नाची ही गोष्ट आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close