पुण्यात वृद्ध महिलेचा खून करणार्‍यास फाशी

May 12, 2010 3:25 PM0 commentsViews: 4

12 मे

पुण्यातील बिबवेवाडी भागात 2007मध्ये वृध्द महिलेचा खून करणारा संदेश ऊर्फ साईनाथ अभंग याला पुणे कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.

अभंगने लूटमारीच्या उद्देशाने शालिनी जाधव यांचा धारदार शस्राने खून केला. तसेच पोलिसांना फोन करण्याचा प्रयत्न करणार्‍या जाधव यांच्या गर्भवती नातसुनेवरही त्याने कुकरीने वार केले होते.

त्यानंतर दागिने लुटून तो फरार झाला. सुनेने केलेल्या वर्णनानुसार पोलिसांनी नऊ दिवसांच्या तपासानंतर अभंगला अटक केली होती.

close