साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ.अक्षयकुमार काळे

December 11, 2016 5:03 PM0 commentsViews:

Akshaykumar-Kale

11 डिसेंबर : डोंबिवलीत होणाऱ्या 90व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून डॉ.अक्षयकुमार काळे यांची निवड झाली. अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत काळे 700 मतांनी विजयी झाले.काळेंना1075 मतं पडली, तर प्रवीण दवणेंना 142 मतं पडली. या निवडणुकीत खरी लढत काळे आणि दवणे यांच्यात होती.

कवितेचे समीक्षक म्हणून अक्षयकुमार काळेंची ओळख आहे. नागपूर विद्यापिठात डाॅ. काळे प्राध्यापक होते.

अध्यक्षपदाच्या शर्यतीत जयप्रकाश घुमटकरआणि मदन कुलकर्णीही होते. घुमटकर यांना पडली अवघी 3 मतं. तर कुलकर्णींना 27.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डोंबिवली इथे 3,4 आणि 5 फेब्रुवारीला होणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा