13 वर्षांच्या मुलीवर शिक्षकाकडून अत्याचार

December 11, 2016 4:45 PM0 commentsViews:

rape

11डिसेंबर: नेरूळमधल्या एका प्रतिष्ठित शाळेत शिकणाऱ्या 13 वर्षांच्या मुलीवर शिक्षकानेच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडलीय.

सातवीत शिकणाऱ्या मुलीवर शाळेतच आरोपी शिक्षकाने वारंवार अत्याचार केल्याने ती गरोदर राहिली. अखेर ही गोष्ट लक्षात आल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात या मुलीने गर्भपात केला. त्यानंतर तिनं धीर करून पोलिसात तक्रार दाखल केली.

याप्रकरणी पोलिसांनी अद्यापही आरोपी शिक्षकाला अटक केलेली नाही. तर या शिक्षकाला शाळा प्रशासनच पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी केलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close