जात जनगणना लांबणीवर

May 12, 2010 5:33 PM0 commentsViews: 4

12 मे

जातीच्या आधारावर जनगणना करण्याचा निर्णय केंद्र सरकारने लांबणीवर टाकली आहे. उद्या होणार्‍या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषयच चर्चेला घेण्यात येणार नसल्याचे समजते.

जातीनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्रिमंडळात तीव्र मतभेद आहेत. त्यामुळे यावरची चर्चा पुढे ढकलण्यात येणार आहे.

जनगणना जातीच्या आधारावर व्हावी, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली होती. त्यांच्यासमोर सरकारला अखेर झुकावे लागले.

आणि नुकत्याच संपलेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात खुद्द पंतप्रधानांनी यावर विचार करण्याचे आश्वासन विरोधकांना दिले होते.

close