रायगडावरील मेघडंबरीतील शिवरायांच्या हातात पुन्हा नवीन तलवार

December 12, 2016 10:56 AM0 commentsViews:

Raigad talwar1

12 डिसेंबर:  रायगडावरच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर आज पहाटे सुर्यादयाच्या मुहुर्तावर नवी तलवार बसवण्यात आली आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी यासाठी पुढाकार घेतला असून त्यांच्याच हस्ते ही तलवार बसवण्यात आली.

रायगडावरच्या मेघडंबरीत बसवण्यात आलेल्या शिवरायांच्या पुतळ्यावरील तलवारीचा काही भाग काल चोरीला गेला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली.  त्यानंतर याठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. भविष्यात काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी याठिकाणी दोन सीसीटीव्हीही बसवण्यात आलेत.

नव्याने बसवण्यात आलेली तलवार 30 इंच लांबीची असून तिचं वजन 50 किलो इतकं आहे. या तलवारीवर नक्षीकामही करण्यात आलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close