24 डिसेंबरला मोदींच्या हस्ते शिवस्मारकाचं भूमिपूजन

December 12, 2016 2:09 PM0 commentsViews:

123724-shivsmarak

अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येणार आहेत. येत्या 24 डिसेंबरला शिवस्मारकाचं भूमिपूजन होणार असून, मोदी अरबी समुद्रात जिथे स्मारक होणार तिथे जाऊन भूमिपूजन करणार आहेत.

आघाडी सरकारच्या काळात अरबी समुद्रात शिवस्मारक बांधण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती. मात्र केंद्रीय परवानग्याविना ते रखडलं होतं.

केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार आल्यानंतर केंद्राकडून परवानग्या मिळाल्या. त्यानंतर आता भूमिपूजनाचाही मुहूर्त ठरला आहे.

दरम्यान, 24 डिसेंबरलाच मेट्रोच्या पुढच्या टप्प्याचंही भूमिपूजन होणार आहे. याच दिवशी मोदी मुंबईत महापालिका निवडणुकीसाठी प्रचारसभा घेण्याची शक्यता आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close