‘लालू, मुलायम कुत्रे…’

May 12, 2010 5:46 PM0 commentsViews: 1

12 मे

भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी एक नवाच वाद निर्माण केला आहे.

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव यांच्याबद्दल त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे.

या दोघाही यादवांचा काँग्रेस विरोध नकली आहे. आणि ते वाघ नव्हेत तर कुत्रे आहेत… असे गडकरी यांनी म्हटले आहे.

चंदिगडमध्ये एका कार्यक्रमात बोलताना गडकरींनी ही टीका केली.

पण त्यानंतर त्यांनी लगेचच सारवासारव केली आहे.

आता मीडियाने आपल्या आपल्या विधानाचा विपर्यास केल्याचा दावा त्यांनी केला आहे.

close