पैठणनंतर नांदेडमध्येही मुख्यमंत्र्यांच्या सभेत घोषणाबाजी

December 12, 2016 4:29 PM0 commentsViews:

Devendra fadnavis

12 डिसेंबर :  मराठा आरक्षण प्रश्नावर मराठा संघटना आक्रमकपणे समोर येत असून सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हदगाव येथील सभेत स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी भाषण सुरू असताना जोरदार घोषणाबाजी केली.  पोलिसांनी लगेचच या कार्यकर्त्यांना ताब्यात घेत नागरिकांना शांत राहण्याचं आवाहन केलं.

नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज सकाळी नांदेड जिल्ह्यात सभा घेतली. हदगावलामध्ये मुख्यमंत्र्यांनी भाषणाला सुरुवात करताच  ‘मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे… एक मराठा, लाख मराठा’ या घोषणा सुरू झाल्या आणि भरसभेत एकच गोंधळ उडाला. दोन ते तीन मिनिटे ही घोषणाबाजी सुरू होती. तर मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात खंड न करता आरक्षण देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, तो तुमचा अधिकार आहे आणि आम्ही देणारच आहोत, असं सांगितलं.

मुख्यमंत्र्यांच्या सभेत घोषणाबाजी होण्याची दिवसभरातील ही दुसरी घटना आहे. मुख्यमंत्र्यांच्या पैठण इथल्या सभेत छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. पोलिसांनी यानंतर 7 जणांना ताब्यात घेतलं. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या बाबतीत राज्य सरकार चालढकल करत असल्याचा या कार्यकर्त्यांचा आरोप होता.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close