बागवे-सत्यपालसिंग शीतयुद्ध

May 13, 2010 8:51 AM0 commentsViews: 18

13 मे

गृहराज्यमंत्री रमेश बागवे आणि पुण्याचे पोलीस कमिशनर सत्यपाल सिंग यांच्यातील शीतयुद्ध आता चांगलेच भडकले आहे.

बागवे यांच्यावर 19 गुन्हे दाखल असल्याने त्यांना पासपोर्ट मिळू शकत नाही, अशी बातमी मीडियाकडे 'लिक' करण्यात आली.

त्यानंतर बागवे यांनी लगेचच पत्रकार परिषद घेऊन ही बातमी खोडसाळ असल्याचे म्हटले.

पुण्यातील बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेला जबाबदार धरून पोलीस कमिशनरांची बदली करावी, अशी मागणी मी केली. त्यामुळेच माझ्या बदनामीचे हे षड्‌यंत्र रचण्यात आले, असा आरोप त्यांनी केला. आता याविरुद्ध मी अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार आहे. तसेच माझ्यावर 19 गुन्हे दाखल असल्याचे सिद्ध झाल्यास आपण ताबडतोब राजीनामा देऊ, असेही बागवेंनी म्हटले.

काही दिवसांपूर्वीच आपण मागास वर्गातील असल्याने पुण्यातील काही वरिष्ठ अधिकारी आपला अवमान करत असल्याचा आरोप बागवेंनी केला होता. आज पुन्हा त्यांनी जातीयवादातूनच हे षड्‌यंत्र रचले जात असल्याचा पुनरुच्चार केला.

तसेच मी पासपोर्ट मागितलेलाच नाही. आणि माझ्यावर कॉलेजमध्ये असताना केवळ दोन राजकीय गुन्हे दाखल झाले होते, असा खुलासाही त्यांनी केला आहे.

त्याचप्रमाणे सत्यपाल सिंग यांच्या बदलीबाबत गृहमंत्री आर. आर. पाटील आणि माझ्यात मतभेद नाहीत, असेही बागवे यांनी म्हटले आहे.

गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्यावर 19 गुन्हे दाखल असल्याचा दावा केला जात आहे. पण मग या प्रकरणाबाबत काही प्रश्नही उपस्थित होतात…

कुठे गेली बागवेंवरच्या गुन्ह्यांची फाईल?

रमेश बागवेंवर झालेल्या आरोपांची पोलीस चौकशी करणार का?

गृहराज्यमंत्र्यांवरील गुन्हे राजकीय आंदोलनातील की गंभीर गुन्हे?

आबा, सोडवणार का गृहराज्यमंत्री आणि पोलिसांमधील तंटा ?

close