‘वरदाह’ चक्रीवादळामुळे तामिळनाडूचं मोठं नुकसान

December 12, 2016 5:28 PM0 commentsViews:

verda-toofan

12 डिसेंबर :तामिळनाडूला ‘वरदाह’ चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसलाय. त्यामुळे वाहतूक आणि लोकलसेवा विस्कळित झालीय. चेन्नईचं विमानतळही काही तासांसाठी बंद राहणार आहे. तामिळनाडूमध्ये संध्याकाळनंतर पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे किनारपट्टीच्या भागात राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय.

चेन्नईजवळचा तांबरम हा हवाई दलाचा तळ बचावकार्यासाठी सज्ज करण्यात आलाय. किनारपट्टीजवळच्या भागात
एनडीआरएफची 15 पथकं तैनात करण्यात आलीयत. चेन्नई, कांचिपुरम, तिरुवल्लुर, विल्लुपुरम या भागांना या चक्रीवादळाचा जास्त फटका बसलाय.उत्तर तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमधल्या मच्छिमारांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

वरदाह चक्रीवादळामुळे विस्थापित झालेल्यांसाठी चेन्नईमध्ये 174 निवारा केंद्रं उभारण्यात आलीयत. सरकारी आणि खाजगी कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांना सुटी देण्यात आलीय. त्यांना घरून काम करण्याचा पर्यायही देण्यात आलाय. वादळामुळे तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातली संपर्क यंत्रणाही कोलमडून गेलीय.

चेन्नई, थिरुवल्लूर आणि कांचिपुरम या जिल्ह्यात भातशेती आणि फळबागांना मोठा फटका बसलाय. आंध्र प्रदेशमध्ये ओंगोले आणि नेल्लोर जिल्ह्यांमध्येही भातशेतीचं नुकसान झालंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close