‘वरदाह’ म्हणजे काय?

December 12, 2016 8:07 PM0 commentsViews:

cyclone-vardah_650x400_41481198000

12 डिसेंबर: तामिळनाडूला ‘वरदाह’ चक्रीवादळ आलंय. या चक्रीवादळाचं नाव ‘वरदाह’ असं का आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. ‘वरदाह’ म्हणजे लाल गुलाब! या चक्रीवादळाला हे नाव पाकिस्तानने दिलंय.

हिंदी महासागरामध्ये जी चक्रीवादळं येतात त्याला नाव देण्यासाठी काही देशांची समिती ठरवण्यात आलीय. भारत,बांगलादेश, थायलंड, म्यानमार, मालदिव आणि ओमान हे देश या चक्रीवादळांची नावं ठरवत असतात.

गेल्या वर्षी चेन्नईमध्ये आलेल्या चक्रीवादळाचं नाव ‘नाडा’असं ठेवण्यात आलं होतं. नाडा म्हणजे काहीच शिल्लक न उरणं. हे नाव ओमानने ठरवलं होतं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close