गडकरींकडून यादवांची माफी

May 13, 2010 9:21 AM0 commentsViews: 3

13 मे

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंग यादव आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी माफी मागितली आहे.

लालूप्रसाद आणि मुलायम हे वाघ नाहीत, तर काँग्रेसचे तळवे चाटणारे कुत्रे आहेत, असे गडकरींनी काल चंदीगडमधील एका जाहीर कार्यक्रमात म्हटले होते.

त्यावरर बराच गदारोळ उठल्यानंतर आज गडकरींनी लखनौमध्ये पत्रकार परिषद घेऊन लालूप्रसाद आणि मुलायम यांची माफी मागितली.

दरम्यान लखनौमध्ये आज समाजवादी पक्षाने नितीन गडकरींचा पुतळा जाळून निषेध नोंदवला.

close