व्हेनेझुएलामध्येही नोटबंदी

December 12, 2016 8:29 PM0 commentsViews:

venezuela-demonetisation

12 डिसेंबर: भारतात नोटबंदीवरून वाद शमलेला नसताना व्हेनेझुएलानेही नोटबंदी लागू केलीय.व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस माड्युरो यांनी याबद्दलची घोषणा केली. त्यामुळे देशातलं सर्वात मोठं चलन असलेल्या 100 बोलिव्हर या नोटा चलनातून बाद
झाल्या. येत्या 72 तासांमध्ये या नोटा चलनामधून बाद होणार असल्यामुळे लोकांनी एटीएमसमोर पैसे काढण्यासाठी रांगा लावल्या आहेत.

देशात वाढलेली प्रचंड महागाई, ड्रग्जमाफियांनी केलेला नोटांचा साठा आणि बनावट नोटांमुळे व्हेनेझुएलाची अर्थव्यवस्था
कोलमडून पडलीय. 100 बोलिव्हरची किंमत दोन अमेरिकन सेंट्स एवढी खाली आलीय. त्यामुळे महागाई आकाशाला
भिडली. या सगळ्यावर उपाय म्हणून सरकारने नोटबंदीचा निर्णय घेतलाय. व्हेनेझुएलाचं सरकार आता नव्या नोटा आणि नाणी बाजारात आणणार आहे. 100 बोलिव्हरची किंमत घसरल्यामुळे आता त्यांना काहीपटीने जास्त किंमतीचं चलन बाजारात आणावं लागेल.

भारतात केलेली नोटंबदी आणि व्हेनेझुएलामध्ये केलेली नोटबंदी यामध्ये मात्र फरक आहे. भारतात काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी नोटबंदीचा निर्णय घेण्यात आला. तर व्हेनेझुएलामध्ये चलनाची किंमत
खालावल्यामुळे त्यांना नोटबंदी करावी लागलीय. याआधी झिम्बाब्वेमध्येही चलनाची किंमत घसरल्यामुळे मोठमोठ्या किमतींचं चलन बाजारात आणावं लागलं होतं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close