कार्ड पेमेंट केल्यास आजपासून पेट्रोल, डिझेलवर 0.75% सूट

December 13, 2016 9:35 AM0 commentsViews:

petrol_34

13 डिसेंबर: पेट्रोल पंपावर पेट्रोल किंवा डिझेल भरण्यासाठी डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर केल्यास आज मध्यरात्रीपासून 0.75% सूट मिळणार आहे. मोबाईल वॉलेट किंवा कार्ड पेमेंट केल्यास डिस्काऊंटचे पैसे पुढील तीन दिवसात तुमच्या खात्यात जमा होतील.

केंद्र सरकारने नोटाबंदीच्या एक महिन्यानंतर कॅशलेस व्यवहारासाठी खास 11 निर्णय जाहीर केले होते. त्यामध्ये पेट्रोल, डिझेलवर सूट देण्याचाही निर्णय घेण्यात आला होता. सरकारच्या या निर्णयामुळे मुंबईत पेट्रोलवर प्रतिलिटरमागे 54 पैसे तर डिझेलवर प्रतिलिटरमागे 45 पैशांची सूट मिळू शकेल.

मोदी सरकारचा कॅशलेस व्यवहार वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. याला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले जात असून गेल्या काही दिवसात कॅशलेस व्यवहारात मोठी वाढ झाली आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली होती.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close