नोटाबंदी हा देशातील सर्वात मोठा घोटाळा – पी. चिदंबरम

December 13, 2016 1:09 PM0 commentsViews:

chidambaram1y

13 डिसेंबर: नोटाबंदी हा देशातील सर्वात मोठा घोटाळा असून याची कसून चौकशी व्हायला हवी अशी जळजळीत टीका माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी केंद्र सरकारवर केली.

चिदंबरम म्हणाले, नोटाबंदीमुळे देशभरात आत्तापर्यंत 98 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नोटाबंदीवर आता कोणाकडेच चांगले शब्द नाहीत, नोटाबंदी म्हणजे ‘खोदा पहाड निकला चूहा’ अशी परिस्थिती असल्याची टीका चिदंबरम यांनी केली. ते पुढे म्हणाले, नोटाबंदीमुळे गरिबांना फायदा होईल हा केवळ आभास आहे, नोटाबंदीच्या निर्णयाचा फटका फक्त गरिबांना बसत आहे, श्रीमंतांना याचा फटका बसलेला नाही, यातून गरिबांना कोणत्याही प्रकारे फायदा होणार नाही.

नोटाबंदी करताना पंतप्रधान नरेंद मोदींनी 50 दिवसात परिस्थिती नियंत्रणात येईल असं सांगितले होतं. मात्र, परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी जवळपास 6-7 महिन्यांचा कालावधी लागेल असंही ते म्हणाले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close