मधुर आणि गुणकारी संत्र

December 13, 2016 2:29 PM0 commentsViews:

13 डिसेंबर : संत्र हे फळ सगळ्यांनाच आवडतं.आता तर संत्र्याचा हंगाम असल्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणावर संत्री दिसून येतात.ज्युस करून किंवा हे फळ अख्खं खाल्लं तरी त्याचा शरीराला फायदाच होतो.पाहुयात त्याचे काही गुणधर्म-

1. संत्र्यात मोठ्या प्रमाणावर फायबर असतं,त्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते.वजन आणि रक्तातल्या साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठीसुध्दा या तंतूंचा (फायबरचा)चांगला उपयोग होतो.

2. थंडीत नियमितपणे संत्र खाणं तुम्हाला निरोगी ठेवतं.त्यामुळे त्वचेवर आर्द्रता आणि ओलावा राहतो.

3.आपले दात आणि शरीरातली हाडं बळकट ठेवण्यासाठी त्यातलं कॅल्शियम मदत करते.त्यामुळे त्याचा वापर च्युईंगममध्ये केला जातो.

4. त्यातल्या व्हिटॅमिन सीमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.त्यामुळे व्हायरल इन्फेक्शनची शक्यता कमी होते.तसेच कॅन्सर आणि ह्रदयरोगाला लांब ठेवते.

5.संत्र्यातील गुणधर्मामुळे किडनी स्टोन होण्याचं प्रमाण कमी होतं,असंही एक निरीक्षण आहे.

6. संत्र्याला स्वत:चा एक छान सुवास असतो,त्यामुळे अत्तरांमध्ये त्याचा समावेश केला जातो.

7.संत्र्यातील सगळ्या गुणधर्मांमुळे अनेक औषधं आणि सौंदर्यप्रसाधनांमध्ये संत्री वापरली जातात.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close