मेडिकल कौन्सिलचे विसर्जन

May 13, 2010 6:03 PM0 commentsViews: 4

13 मे

देशातील वैद्यकीय शिक्षणासाठी जबाबदार असलेली ऑल इंडिया मेडिकल कौन्सिल विसजिर्त करण्यात येणार आहे.

गुरुवारी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

सात डॉक्टरांची एक समिती काही काळापुरती मेडिकल कौन्सिलचे काम बघणार आहे.

एम्सचे माजी संचालक डॉ. वेणुगोपाल हे या समितीचे सदस्य असतील.

मेडिकल कौन्सिलचे प्रमुख डॉ. केतन देसाई यांना 22 एप्रिलला लाच घेताना पकडले होते. त्यानंतर त्यांच्याकडे कोट्यवधी रुपयांचे घबाड सापडले. या भ्रष्टाचारात कौन्सिलचे अनेक सदस्य सहभागी असल्याची शक्यता आहे.

देशातील एकंदर वैद्यकीय शिक्षण व्यवस्था धोक्यात आल्यामुळे हा निर्णय घेतला गेला आहे.

close