विकास आराखड्याच्या जागेवरील आरक्षण काढण्यासाठी बापटांनी 50 लाख मागितले -अजित पवार

December 13, 2016 5:59 PM0 commentsViews:

 ajit_pawar_bapat

13 डिसेंबर : गिरीश बापट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेनंतर एका कार्यकर्त्याकडे विकास आराखड्यात जागेवर पडलेले आरक्षण काढण्यासाठी  50 लाख रूपयांची मागणी केली असल्याचा गौप्यस्फोट माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलाय.

बारामतीत पार पडलेल्या प्रचारसभेत अजित पवारांनी गिरीश बापटांवर घणाघाती आरोप केलाय. सध्या वेगवेगळ्या पद्धतीचं राजकारण सुरू आहे. मुख्यमंत्र्यांची 10 तारखेला सभा होती. त्यावेळी गिरीश बापट आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे यांनी एका बाळासाहेब गावडेंच्या घरी त्या कार्यकर्त्याला बोलावं. पण त्याने येण्यास विरोध केला.

त्यानंतर पुन्हा त्याला उंदवडीच्या अलीकडे असलेल्या पेट्रोल पंपावर भेटण्यासाठी बोलावलं. तिथे बारामतीच्या विकास आराखड्यात जागेवर पडलेले आरक्षण काढण्यासाठी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष बाळा भेगडे, बाळासाहेब गावडे, पुणे बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे या पदाधिका•यांनी त्याच्याकडून 50 लाख रुपयांची मागणी केली असल्याचा गंभीर आरोप अजित पवारांनी केलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close