‘फास्ट ॲन्ड फ्युरिअस 8’चा ट्रेलर लॉन्च

December 13, 2016 6:19 PM0 commentsViews:

13 डिसेंबर-हॉलिवूडचा ॲक्शनपॅक्ड सिनेमा ‘फास्ट ॲन्ड फ्युरिअस 8’चा ट्रेलर लॉन्च झाला.आतापर्यंत जवळपास 10 लाख लोकांनी हा ट्रेलर पाहिलाय.या चित्रपटाच्या गेल्या सर्व भागांप्रमाणेच यातही खुप स्टंट्स,ॲक्शन आणि थरार असेल,याविषयी शंका नाही.

गेल्या वर्षी आलेल्या ‘फास्ट आणि फ्युरिअस 7’ने जगभर मोठी कमाई केली होती.जवळपास 1 अब्ज गल्ला गोळा करणाऱ्या जगातल्या काही चित्रपटांपैकी तो एक चित्रपट मानला जातो.हा चित्रपट येत्या 14 एप्रिलला रिलीज होतोय.

एफ.गॅरी ग्रे या चित्रपटाचं दिग्दर्शन करतोय.’ट्रिपल एक्स:द रिटर्न ऑफ क्झेंडर केज’मध्ये विन डिजल आणि बेवॉचमध्ये ड्वेन जॉन्सनला लोकांनी मोठी पसंती दिलीच आहे.तर या चित्रपटात विन डिजल आणि ड्वेन जॉन्सन या दोघांना एकत्र पाहण्याची संधी त्यांच्या चाहत्यांना मिळत्येय.

या भागात पॉल वॉल्करला मात्र सगळेच मिस करणार.कदाचित त्याच्या अपघाती मृत्यूमुळेच गेल्या भागाकडे त्याचे चाहते खेचले गेले असणार.निर्मात्यांनी त्या भागात शेवटी त्याच्या आठवणींचं एक गाणंही समाविष्ट केलं होतं .जे प्रेक्षकांना खूप आवडलं होतं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close