मोदींनी जनतेचा पैसा बँकेत अडकवून ठेवला -राहुल गांधी

December 13, 2016 6:23 PM0 commentsViews:

rahul_gandhi_313 डिसेंबर : नोटबंदीच्या माध्यमातून देशातल्या जनतेचा पैसा पंतप्रधान नरेंद्र मोदींना बँकांमध्ये अडकवून ठेवायचा असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलाय.

नोटाबंदीच्या विरोधात राहुल गांधी यांनी मोहिम हाती घेतलीये. आज ते नवी दिल्लीतील दादर भाजी मंडईत भेट दिली. यावेळी त्यांनी मजूर आणि भाजी विक्रेत्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा नोटबंदीवरुन नरेंद्र मोदींवर टीका केली.

देशातल्या उद्योगपतींनी बँकांचे 8 लाख कोटी बुडवले आहे. हे उद्योगपती मोदींचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे उद्योगपती पैसा देणार नाहीत असा दावाही राहुल गांधी यांनी केलाय. तर दुसरीकडे बँका चालवण्यासाठी पैसा राहिलेला नाही. या बँका चालवण्यासाठी सामान्यांचा पैसा बँकांमध्ये अडकवण्यात आल्याचा आरोप राहुल गांधींनी केला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close