शिवरायांसमोर नाक घासून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा माफीनामा

December 13, 2016 6:45 PM0 commentsViews:

13 डिसेंबर : किल्ले रायगडावर दारू पिऊन धिंगाणा घालणा•या जळगावातील राष्ट्रवादीच्या 3 नगरसेवक आणि त्यांच्या नातेवाईकांना शिवप्रेमींनी चांगलीच अद्दल घडवली. या तळीरामांना जळगावातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नाक घासून माफी मागायला लावली.

आज जळगाव येथे या तीन नगरसेवकांना आणि त्यांच्या पाच नातेवाईकांना शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नाक घासून माफी मागण्यास स्वराज्य निर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी भाग पाडले. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

raigad_ncp34रायगडावर पर्यटनासाठी गेलेल्या जळगाव शहरातील राष्ट्रवादीच्या तीन गट नेत्यांना रायगडावर मद्य प्राशन केले म्हणून त्या ठिकाणी शिव भक्तांनी मारहाण केली होती. त्यानंतर जळगावला परतलेल्या या राष्ट्रवादी च्या तीन गट नेत्यांसह त्यांच्या पाच नातेवाईकांना स्वराज्य निर्माण सेनेने चांगलाच दणका दाखवला. आज या तीन जणांना घेराव घालून त्यांना जळगाव येथील शिवतीर्थ मैदान येथे शिवस्मारकासमोर नाक घासून माफी मागायला भाग पाडले आणि इथून पुढे अशी चूक होणार नाही असा माफीनामा त्यांच्या स्वलेखित लिहून घेतला.

माफीनामा रायगड किल्ले समितीकडे पाठवले जाणार असल्याचे स्वराज्य निर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे. 7 डिसेंबरला रायगड या पवित्र ठिकाणी मद्य प्राशन करून तमाम शिवभक्तांच्या भावनेला ठेच पोहचवली होती. त्याबद्दल त्या ठिकाणी त्या आठ जणांना मारहाण झाली होती. या प्रकरणी पश्चाताप झालेल्या अतुल बारी शरीफ पिंजरी आणि वीरेंद्र सिंह राजपूत या तिघांनी माफीनामा लिहून दिला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close