कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयात मोडतोड

May 14, 2010 9:59 AM0 commentsViews: 1

14 मे

पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या जागेची मागणी करत आज कोल्हापुरात दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून काचा फोडल्या.

शिरोळ्यामधील पुरग्रस्तांच्या पुर्नवसनाची जागा गेले कित्येक महिने पाठपुरावा करूनही त्यांना मिळालेली नाही.

त्यामुळे हे कार्यकर्ते आज जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा करण्यासाठी गेले होते. पण जिल्हाधिकार्‍यांच्या दालनात प्रवेश नाकारला गेल्याने 100 कार्यकर्त्यांनी दालनाच्या दरवाज्याच्या काचा फोडल्या.

शिवाय कार्यालयाचे लोखंडी गेटही तोडून टाकले. या तोडफोडीनंतर जिल्हाधिकार्‍यांना या कार्यकर्त्यांशी चर्चा करावी लागली. त्यात त्यांनी या कार्यकर्त्यांना 11 दिवसांत पुनर्वसनासाठी जागा मिळवून देऊ, असेआश्वासन दिले.

close