नवी मुंबई विद्यार्थिनीवर बलात्कार प्रकरणी मुख्याध्यापिका अटकेत,आरोपीही निलंबित

December 13, 2016 7:19 PM0 commentsViews:

navi_mumbai3413 डिसेंबर : नवी मुंबईतल्या 13 वर्षांच्या विद्यार्थिनीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिका सविता गुलाटी यांना अटक करण्यात आलीये. आरोपी हरिशंकर शुक्ला याला पळून जाण्यात मदत केल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात आरोपीला मदत केल्यानं गुलाटी यांना अटक करण्यात आली आहे. तर आरोपी शिक्षक हरिशंकर शुक्ला यालाही शाळेनं निलंबित केलंय.

एमजीएम शाळेच्या संस्थेनं हा निलंबनाचा निर्णय घेतलाय. त्यापूर्वी आज सकाळी शाळेवर संतप्त पालकांनी मोर्चा काढला. तर दुसरीकडे या प्रकरणाची चौकशी करणा•या चौकशी करणा•या सहाय्यक पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांना निलंबित करण्यात आलंय.

मोरे यांनी या प्रकरणात कारवाई करताना निष्काळजीपणा केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. 29 सप्टेंबरला हा गुन्हा दाखल झाल्याचं सांगण्यात येतंय. यासंदर्भात पालकांनी पाठपुरावा करुन ही मोरे यांनी त्याची दखल न घेतल्यानं ही कारवाई झालीय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close