उद्या ऑरेंज सिटीत भगवं वादळ !

December 13, 2016 7:28 PM0 commentsViews:

maratha_morcha313 डिसेंबर : मोठ्या विश्रांतीनंतर मराठा क्रांती मोर्चाचं वादळ आता ऑरेंज सिटीत घुमणार आहे. उद्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर मराठा क्रांती मोर्चा धडकणार आहे.

आरक्षण, कोपर्डीच्या बलात्कार, खून प्रकरणातील आरोपींना फाशी आणि ऍट्रोसिटी कायद्यातील कलमांमधील बदल या मागण्यांसाठी हा मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चासाठी राज्यातल्या कानाकोप-यातून मराठा समाजाचे लोक नागपूरमध्ये दाखल होत आहे. उद्या होणारा मोर्चा हा ऐतिहासिक ठरेल असा आयोजकांचा प्रयत्न आहे.

या निमित्तानं मराठा समाजाचं शक्तिप्रदर्शन पाहायला मिळणार आहे. सरकार मराठा समाजाच्या मागण्यांवर सकारात्मक असून मोर्चाच्या आयोजकांशी चर्चेसाठी तयार असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close