याला म्हणता बॉस, 4.3 कोटी खर्चून कर्मचाऱ्यांना नेलं मालदिवला !

December 13, 2016 9:10 PM0 commentsViews:

boss-picture-768x51113 डिसेंबर : नेहमी ऑर्डर देणार बॉस तुम्हाला तब्बल 4.3 कोटी रुपये खर्च करून मालदिवला शानदार पार्टी दिली तर…दचकू नका हे खरंच… एवोल्व मिक्स्ड मार्शल आर्ट्सचा मालक आणि सीईओ चत्री यांनी आपल्या 100 कर्मचाऱ्यांना मालदिवला शानदार व्हेकशन टूर दिला.

या फाईव्ह स्टार पिकनिकचा खर्च जवळपास 4.3 करोड रुपयांपर्यंत गेला. त्याच्या कंपनीला वार्षिक 30 टक्के नफा झाल्यामुळे त्याला सर्वांच कौतुक करायचं होतं. त्यासाठी त्याने हा मार्ग निवडला. खरंतर दरवर्षीच ते अशा पिकनिकला कुठे ना कुठे जातातच,मात्र मालदिव हे ठिकाण त्यांच्यालाठी सरप्राईज पॅकेज ठरलं.

boss-2आता तुम्हालाही इकडे काम करावंसं वाटत असेल तर ऐका. 200पैकी एका उमेदवाराची निवड तिकडे केली जाते चत्री म्हणतात,’आम्ही दरवर्षी अशा टुरला जातोच मात्र ठिकाण हे सर्वांसाठी सरप्राईज असतं. त्यांना पर्यटनाची आवड आहे पण त्यांचं ठरवून जाणं होत नाही.अशा ब्रेक्सनंतर कामांचा वेग वाढतो.’

boss-partyखरंतर कोणालाही आपल्या कामासाठी कौतुकाची अपेक्षा असते. एक कौतुकाची थाप कामात उत्साह आणते. कोणीतरी आपल्या कामाची कदर करतंय,ही भावनाच छान असते. यांचं उदाहरण आपल्या बॉसनी घ्यायला हवं. अगदी मालदिव नको पण किमान एकदिवसीय पिकनिकला तरी त्यांनी आपल्याला न्यावं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close