झोपडपट्टी पाडण्यास विरोध

May 14, 2010 10:12 AM0 commentsViews: 6

14 मे

मानखुर्दमध्ये अण्णाभाऊ साठे नगरातील 3200 झोपड्या पाडण्यास स्थानिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून चांगलाच विरोध होत आहे. या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे.

झोपडपट्टी हटवण्याच्या कारवाईला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांचा विरोध आहे. काल या परिसरातील सुमारे 3200 झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या. या कारवाईला झोपडपट्टी धारकांनी जोरदार विरोध केला होता.

हा विरोध मोडून काढण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला. आजही मोठ्या पोलीस बंदोबस्तात झोपडपट्‌ट्या तोडण्याची कारवाई सुरू आहे.

कोणतीही पूर्वसूचना न देता ही कारवाई करण्यात येत आहे, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. पण या कारवाईला विरोध करण्यासाठी मेधा पाटकर आणि आरपीआय नेते रामदास आठवले घटनास्थळी पोहोचले.

या कारवाईला स्थगिती द्यावी, अशी मागणी मेधा पाटकर यांनी केली आहे.

close