महापौरांच्या विरोधात याचिका

May 14, 2010 10:23 AM0 commentsViews:

14 मे

मुंबई महापालिकेच्या एफ नॉर्थ प्रभाग समितीच्या निवडणुकीत महापौरांनी गैरप्रकार केल्याचा आरोप काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राजहंस सिंग यांनी केला आहे.

या संदर्भात काँग्रेसने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

रवीराजा, प्रेसिला कदम आणि रघुनाथ थवई यांनी ही याचिका दाखल केली आहे.

सात जणांच्या विरोधात ही याचिका दाखल करण्यात आली.

यात मुंबई महापालिका प्रशासन, महापौर श्रद्धा जाधव, आयुक्त स्वाधीन क्षत्रिय, सचिव मृदुल जोशी, एफ नार्थ वॉर्डचे असिस्टंट कमिशनर प्रदीप पवार, एफ साऊथ वॉर्डचे असिस्टंट कमिशनर हर्षद काळे आणि या निवडणुकीत निवडून आलेले शिवसेनेचे नगरसेवक अनिल पवार यांच्यावर आरोप करण्यात आला आहे.

close