‘ट्युबलाइट’मध्ये सलमानचं हॅपी साँग, फोटो वायरल

December 14, 2016 1:15 PM0 commentsViews:

salman-khan-tubelight-759

14 डिसेंबर – सलमान खानच्या ‘ट्युबलाइट’चं शूटिंग सुरू आहे. कबीर-सलमान ही दिग्दर्शक -अभिनेता ही जोडी पुन्हा एकदा ट्युबलाइटचा प्रकाश पाडायला सज्ज झालीय. आणि कबीरनं इन्स्टाग्रामवर हॅपी साँग या गाण्याच्या शूटचे फोटो शेअर केलेत.

‘ट्युबलाइट’च्या फोटोत सलमान नाचतोय. त्याची व्यक्तिरेखा एकदम शांत आणि संयत वाटते. सिनेमात चिनी अभिनेत्री झू झूचं आकर्षण आहे.

कबीरनं तिच्यासोबतचे फोटोही ट्विट केलेत. त्यानं झू झूचं काम आटोपल्याचं म्हटलंय. आणि ‘वुई मिस यू’ असं कबीरनं ट्विट केलंय.

‘ट्युबलाइट’ सिनेमा हा भारत-चीनमधल्या 1962च्या युद्धावर आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close